
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव तालुक्यातील विहिगाव येथे माघ पौर्णिमाच्या पावन पर्वावर जगाला प्रज्ञा,शील आणि करूणेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना आणि बौद्ध धम्म संमेलन संपन्न झाले.
भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याआधी विहिगाव गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्या नंतर पुज्य भिक्षु संघाद्वारे मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी बुद्ध,धम्म संघ,वंदना,महापरित्राणपाठ घेण्यात आले.
यानंतर दुसऱ्या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्विकारला?या विषयावर बौद्ध धम्म संमेलन पार पडले.या संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रदिप गायकवाड होते;तर प्रमुख अतिथी म्हणून माजी न्यायाधीश अनिल वैद्य,महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे अध्यक्ष जयंतराव अभ्यंकर,अँड.गुणरत्न रामटेके,सुनील खराटे,स्थानिक आमदार,रामेश्वर अभ्यंकर,प्रताप अभ्यंकर,विहिगाव येथील सरपंच सौ.जयश्री श्रीकांत पोटदुखे,उपसरपंच भैय्यासाहेब अभ्यंकर,शेगर गायकवाड,डॉ.अंजली अभ्यंकर,डॉ.हरिष अभ्यंकर, श्रीकांत पोटदुखे सह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अस्मिता अभ्यंकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे मुख्यआयोजन प्रा.संजय अभ्यंकर यांनी केले होते.कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी समता सैनिक दल व सुजाता महिला मंडळ,यशोधरा महिला मंडळ तसेच युवक मंडळाच्या सर्व सदस्यानी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे बौद्ध उपासक व उपासिका यांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते हे विशेष,कार्यक्रमाची सांगता महाभोजन दाणाने करण्यात आली.
—————————————-
“बौद्ध धम्म हा भारतील संस्कृतीचा एक भाग आहे.भारताचा वैभवशाली इतिहास,परंपरा कायम ठेवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून केले आहे.अश्या महान धम्माचे आचरण करुन आपले व जगाचे सुध्दा कल्याण होवू शकते.भगवंतानी वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेला धम्म असुन प्रज्ञा,शिल,समाधीचा कल्याणकारी मार्ग दिला आहे.तेव्हा भारताच्या इतिहासाला,परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे.बौध्द धम्माचे चक्र गतिमान करण्यासाठी शिल सदाचारी बनुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व भगवान बुद्धांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवा. बुद्धांचे विचारच जगाला शांतीचा मार्गाने तारु शकतात…!”
– प्रदिप गायकवाड
—————————————-
“विपश्यना हि भगवान बुद्धांची शिकवण आहे.काही कालखंड ति लुप्त झाली होती,तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने भगवंताची शिकवन गोयंका गुरुजी यांनी पुन्हा भारतात आणली.तेव्हा विपश्यना साधनेचे प्रत्येक बौद्ध उपासक व उपासिका आचरण करावे.”
– ज.मो.अभ्यंकर
—————————————-
“डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिल्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला न्याय मिळाला आहे.सर्व हक्क अधिकार,स्वतंत्र,सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे मिळाले आहे.”
-अनिल वैद्य
————————-—————