
दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड -प्रतिनीधी अंगद कांबळे
म्हसळा – नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या नियमानुसार व मार्गदर्शनाखाली,दिव्यांग योगासन स्पोर्ट्स कमिटी तर्फे पहिली दिव्यांग रायगड जिल्हा योगासन स्पोर्टस स्पर्धा दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ वेळ १० वाजता रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व सोमजाई माता क्रीडा मंडळ ट्रस्ट खरसई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमजाई माता क्रीडा मंडळ प्रशिक्षण सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली होती दीव्यांग प्रवर्गातील अंध, कर्णबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग मुले व मुली यांनी स्पर्धेत सहभाग घेतला व आपल्यातील कौशल्य दाखवून दिले या कार्यक्रमासाठी प्रमुखपाहुने म्हणून श्रीमती छायाताई म्हात्रे माजी सभापती पंचायत समिती म्हसळा, श्री निलेशजी बारक्या नाकती कार्यकर्ते दिव्यांग संघटना तथा सामाजिक कार्यकर्ते, विजय विठोबा लाड, संतोष सहदेव शेडगे, अरुण हिराजी माळी, श्री बालाजी, उत्तम मांदारे सोमजाई माता ट्रस्ट चे श्री चंद्रकांत खोत व पदाधिकारी उपस्थित होते
या वेळी विद्यार्थी, तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्यात हि काही कमी नाही आम्हाला हि संधी मिळाली तर आम्ही कमी नाही हे दाखवून दिले चॅम्पियशीप २०२२/२३ पात्र ठरलेल्याना प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले योग स्पर्धेत यॊगाचे प्रकार श्रीमती छायाताई म्हात्रे म, श्री निलेशजी बारक्या नाकती, शेडगे, सदादादा सहभाग घेऊन आपली कला सादर केली.
पंच म्हणून दिव्या नामदेव खोत, निशा पाटील, शेजल माळी, कृतिका पयेर, मानसी मांदाडकर काशिनाथ कोकाटे
श्री. उत्तम मांदारे योग प्रशिक्षक यांनी कामं पहिले व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले