
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरातील मनीषा शिंदे चा काही दिवसा पूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जी पणा मुळे मृत्यू झाला होता त्या प्रकरणी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. परंतु बोध होत नसल्याने सुस्पष्ट अहवाल पाठवण्याची सूचना देगलूर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली
मनीषा शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे आरोप असलेले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठक्करवाड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. नुकताच या समितीचा अहवाल देगलूर पोलिसांना प्राप्त झाला आहे. मात्र, या अहवालातील मजकुराचा बोध होत नसल्याने स्वयंस्पष्ट अहवाल परतपाठविण्याच्या मागणीचे पत्र देगलूर पोलिसांनी संबंधित विभागाकडे दिल्याने या अहवालाकडे मयत शिंदे यांच्या कुटुंबीयांसह अनेकांचे लक्ष यांचा मृत्यू झाला. लागून राहिले आहे.
उपजिल्हा रुग्णालय, देगलूर येथे १६ डिसेंबर रोजी डॉ. प्रदीप ठक्करवाड यांनी मनीषा प्रभाकर शिंदे यांच्यावरकुटुंब नियोजन व प्रसुतीची शस्त्रक्रिया केली होती. यादरम्यान मनीषा
यांची प्रकृती खालावल्याने २० डिसेंबर रोजी नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय येथे मनीषा शिंदे यांचा मृत्यू झाला.
हा मृत्यू डॉ. ठक्करवाड यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांसह
सर्वपक्षीयांकडून उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर येथे ३० डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात आला होता.
याप्रकरणाची दखल घेत नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक नीळकंठ भोसीकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत केली होती. ६ जाने. रोजी नांदेड येथे या समितीकडून मयत मनीषा शिंदे यांचे पती व भाऊ यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचा जबाबही नोंदविला होता. नुकताच देगलूर पोलिस स्टेशन येथे चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असला तरी या प्राप्त अहवालातील मजकुराचा बोध होत नसल्याने परत एकदा स्पष्ट अहवाल पाठविण्याची मागणी देगलूर पोलिसांनी संबंधितांकडे पत्राद्वारे केली आहे. खरंच मनीषा शिंदेला न्याय भेटेल का अशी अपेक्षा देगलूर मधील नागरिकांमध्ये होत आहे.