
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून कन्याकुमारी ते कशमीर पर्यंत काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेत मराठवाड्यातून एकमेव सहभागी झालेले श्रावण रॅपनवाड यांचा मुखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित होता करण्यात आला होता. यावेळी डॉ. श्रावण रॅपनवाड यांचा काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात भव्य सन्मान करण्यात आला.
देशातील शेतकन्यांच्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी काढण्यात
आलेल्या भारत जोडो यात्रेत मराठवड्यातून एकमेव मुखेडचे सुपुत्र डॉ. श्रावण रॅपनवाड यांची निवड झाली होती आणि ते १३ राज्य ४ हजार किलोमीटर व १४७ दिवस पायी चालत काशमीर येथे भारत जोडो यात्रेचा समारोप करून ते आज मायभूमीत सुखरूप परतले आहेत त्यामुळे त्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. अविनाश घाटे, बहुजन चळवळीचे नेते दशरथ लोहबंदे, नांदेड बहुजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू पाटील राजूरकर, किसान सेना जिल्हाप्रमुख शंकर पाटील लुन्हे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, माजी
जिल्हा परिषद सदस्य बालाजी बडे, शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, माधवराव पाटील उंद्रिकर, विश्वनाथ कोलमकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बोनलेवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील मुक्कावार, दिनेश पाटील केरुरकर, रमाकांत पाटील जाहुरकर, काँग्रेसचे दिलीप कोडगिरे, नंदकुमार मडगुलवार, युवकांचे नेते राहुल लोहबंदे. शौकत पठाण, शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसने, बालाजी पाटील सांगवीकर, अखिल येवतीकर, रियाज शेख यांच्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत नारनाळीकर यांनी केले आहे.