
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहा तालुक्यातील अष्टुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रणमर्द शिव-शंभू युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र-राज्य यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये सहभाग शाळेतील विद्यार्थींना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आले, यामध्ये चित्रकला परीक्षेत विशेष प्राविण्यासह पास झालेल्या विद्यार्थींना चित्रकलेच्या कीट वाटप रणमर्द शिव शंभू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश पाटील बाबर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेतील शालेय विद्यार्थ्यांना पण बक्षीसांच वाटप करण्यात आले. यावेळी मंथन पा. बाबर, प्रदीप पा. बाबर, जिल्हा परिषद हायस्कूल, आष्टूरचे मुख्याध्यापक श्री. टोम्पे सर शिक्षकवृंद शिवप्रेमींनी बांधव मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपस्थित होते.