
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
जर लहानपणीच स्पर्धा परीक्षा देण्याची सवय लागली तर भविष्यातील शैक्षणिक स्पर्धेच्या वातावरणात टिकाव धरू शकतो असे प्रतिपादन भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी केले.
ते देशमुख प्रतिष्ठानने शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विद्याभवनचे माजी मुख्याध्यापक डि.के.कुलकर्णी, दिलीपसिंह देशमुख, देशमुख प्रतिष्ठान चे सदस्य सतीश टोणगे, बालाजी निरपळ,करसन पटेल,राजेंद्र बिक्कड,रमेश अंबिरकर,बालाजी सुरवसे,ओंकार कुलकर्णी, संदीप कोकाटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना प्राचार्य मातने म्हणाले की, लहान वयात स्पर्धा परीक्षा देण्याची सवय लागली की विद्यार्थी अभ्यास करतो.अभ्यासाची गोडी निर्माण होण्यासाठी अशा स्पर्धा परीक्षा उपयुक्त ठरतात आणि या परीक्षाच्या ज्ञानावरच भविष्यातील यश अवलंबून असते. त्यामुळे देशमुख प्रतिष्ठानने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बिक्कड, प्रस्ताविक दिलीपसिंह देशमुख तर .पाहुण्यांचे स्वागत ॲड.पृथ्वीराज देशमुख व आभार सतीश टोणगे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशमुख प्रतिष्टान व मॉडेल इंग्लिश स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
……………
कळंब येथील देशमुख प्रतिष्ठानने शिवजयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामान्य ज्ञान वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी, लता मंगेशकर प्राथमिक विद्यामंदिर,आदर्श इंग्लिश स्कूल व मॉडेल इंग्लिश स्कूल कलम या शाळेतील विजयी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साने गुरुजी कथा मालेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डि.के. कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.