दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आष्टी(श)(वर्धा): नजीकच्या धाडीगावातील १५ महिलांना वरुडस्थित(जि.अमरावती) फिनकेअर फायनान्स बँकचे १ लाख रुपये कर्ज मिळवून देण्यासाठी प्रत्येकी महिलांकडून गैरमार्गाने ४ हजार ३५० रुपये वसूल केल्याबाबत फीन केयर स्मॉल फायनान्स लिमिटेड बँकेच्या व्यवस्थापकांनी पोलीस स्टेशन आष्टी येथे दोन अनोळखी भामट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे दिलेल्या पो. रिपोर्ट नुसार गेल्या १७ मार्च रोजी बँकेच्या शाखेत ३० महिलांनी कर्ज मागण्यासाठी शाखेत आल्या तेव्हा भामट्यांनी आमच्या बँकेचा गैरवापर केला असे निदर्शनास आले त्यामुळे बँकेची मोठ्या प्रमाणात बदनामी व प्रतिष्ठेची हानी झाली असून आमची बँक कोणत्याही ग्राहकाकडून पैसे घेवून कर्ज मंजूर करत नाही महिलांनी वर्णन केलेले इसम बँकेचे कर्मचारी नाही अश्या भामट्या लोकांकडून बँकेला धोका असून महिलांनी वर्णन केलेल्या अनोळखी इसमावर आवश्यक गुन्हा दाखल करण्यासाठी रिपोर्ट दाखल केली आहे याबाबत असे की नजीकच्या धाडी गावातील महिलांना फिन केअर बँकेच्या नावावर १ लाख रुपये कर्ज मिळवून देण्यासाठी १५ महिलांकडून प्रत्येकी ४ हजार ३५० रुपये वसूल करत दोन भामटे पसार झाले आहेत मात्र त्यांचे छायाचित्र काही उपस्थित महिलांनी काढले आहे तर काहींनी दुचाकीचा फोटो काढला आहे कानात कुंडल व त्वचा वर्णनाने सावळा रंग असलेला अस्सल भामटा धाडी येथील महिलांना राकेश पाटील नाव सांगत होता तर सोबत असलेला बोगस इसम बँकेचा डी.एम.असल्याची ओळख देत होता तर संपर्क भ्रमणध्वनी ९९२३६४३९०१ असा दिला, तर नजीकच्या सत्तारपुर गावात ८५०५०६१२८१ असा बोगस भ्रमणध्वनी दिला आहे शिवाय भामटे ज्या दुचाकीने प्रवासीत झाले त्या दुचाकीचा क्र एम.एच.३६ एम.५६३५ असा
प्रत्यक्षदर्शीने फोटोत टिपला सध्या मात्र दोन्ही भ्रमणध्वनी बंद येत असून त्यातील एक मो.नंबर हिंदी भाषिकांचा दिसत आहे पण दोन्ही भामटे अस्सल मराठीत संवाद साधत होते असे प्रत्यक्षदर्शी महिला सांगत आहे सोबतच वरूड तालुक्यातील पेठ मंगरुळी, रोषणखेडा या गावातही अशीच महिलांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे या फसवणुकीबाबत आष्टी पोलिसात दोन रिपोर्ट झाले आहेत त्यामुळे आष्टी पोलीस याबाबत काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
