
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी –
श्री संजय गायकवाड
आमदार विधानसभा ……….
आज आपण कर्मचारी यांच्या विषयी बोलताना अक्षरशः गरळ ओकली….
सर्व प्रथम मी आपला जाहीर निषेध करतो.
साहेब आपण म्हणालात की 95 टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात. कदाचित ते आपल्या दृष्टीने योग्य पण असेल (जशी दृष्टी तशी सृष्टी), पण सामान्य जनता तर आपण 100% हरामी आहात हे म्हणत आहे याचे काय करायचे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तर 5 टक्क्याने बरे तरी अहोत.
चला तर आपले उद्योग मी सांगतो….
1. आपली पगार 2,72,148/-
मला एक सांगा कोणती परीक्षा पास झालात की एवढ्या रकमेची पगार तुम्हाला मिळते? आपण तर फक्त 9 वी पास आहात यापेक्षा आमचा क्लास फोर बरा त्याची शासकीय नोकरीत येण्याची शैक्षणीक पात्रता आपल्या पेक्षा जास्त आहे.
2. किती आमदार लोक पदवीधर आहेत?
बरं असेल ही किती लोकं गोल्ड मेडल प्राप्त आहेत?
हा एक संशोधनाचा विषय आहे.
3. साहेब किती आमदार लोकाकडे घर घेण्यासाठी होमलोन आहे?
(एकावरही होमलोन नसेलच तरी तुम्हाला मुंबईत घरे देण्याचे जाहीर केले त्याच्या विरोधात ना सत्ताधारी ना विरोधी आमदारांनी आवाज उठवला आहे)
4. किती आमदार लोकाकडे गाडी घेण्यासाठी वेहिकल लोन काढले आहे? (वेहीकल लोन तर नसेलच परंतु 80 लाख बिनव्याजी गाडी खरेदी करण्यासाठी जाहीर करून घेतले, किती आमदारांनी त्याला विरोध केला आहे)
5. किती आमदार लोकं बसने प्रवास करतात?
6. किती आमदार लोकांनी भारतीय रेल्वेमधून प्रवास केलाय?
7. विकास कामे करताना किती कार्यकर्ते आपण पोसले?
8. किती कामे बोगस केली?
9. किती कामाची टेंडर आपण आपल्या नातलगांना दिली.
10. साहेब 1950 पासून आपण जनतेच्या पाणी, रस्ता, आणि रोजी रोटीवर निवडणूक लढवली, आपल्या मतदार संघातील वरील गरजा झाल्या का पूर्ण?
11. जाती धर्माचे राजकारण करून आपण किती भांडणे लावली?
12. किती आमदार लोकांची मुले शिक्षक आहेत? किती आमदार लोकांची मुले ग्रामसेवक, तलाठी आहेत?
13. किती आमदार लोकांची मुले भारतीय सीमेवर आहेत?
14. किती आमदार लोकांची मुले शेती करतात?
15. किती आमदार लोकांची मुले ऊसतोड करतात?
कळुद्या आम्हाला!
साहेब खाजगीकरण करून आपण पूर्ण राज्याला एका अंध:कारात लोटत आहात. भविष्यात कोणत्याच शेतकऱ्यांच्या , कामगाराच्या मुलांना सरकारी नोकरी लागणार नाही याची आपण जोरदार तयारी केली. आणि 9 कंपन्याला नोकर भरती देऊन आपण कायम महाराष्ट्र धनाड्या लोकांना विकला आहे.
साहेब आजपर्यंत शेतकरी, मजूर , कामगार यांच्यावर राजकारण करून आपली खोळ गच्च भरली. पुढील सात सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आपण जमवून ठेवलेली आहे, जनतेला याची पूर्ण खात्री आहे की आपण ती कोणत्या मार्गाने कमावली आहे.
किती शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला किती शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळाले किती शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली परदेशातून कापसाच्या गाठी बोलावून शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये गोठवला.
हे पाप कोणी केले?
भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आपण शेतकऱ्यांना हमी भाव देणार होतात अजूनही आपण विधान भवनामध्ये एकही प्रश्न मांडलेला नाही?
तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही
शेतकरी परेशान कामगार परेशान कर्मचारी परेशान उद्योगवाले परेशान व्यावसायिक परेशान बेरोजगार परेशान
मग हा महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ कसा?
साहेब एक हक्काची पेन्शन मागितली होती… स्वतःची पेन्शन मंजूर करताना दोन मिनिटांमध्ये आपण विधान भवनामध्ये मंजूर केली.
आमदारांना गाड्या घेण्यासाठी 80 लाख रुपये शून्य मिनिटात आपण मंजूर केले आपल्या ड्रायव्हरला पगार आमच्याकडून महाराष्ट्र स्थापनेपासून अजूनही आकाशवाणी आमदार निवास जैसे त्या परिस्थितीमध्ये आहे.
मागील काळामध्ये बांधलेले मनोरा नावाचे आमदार निवासस्थान इतक्या लवकर पाडण्यास भाग का ठरले?
आमदार साहेब अजून खोल विषयावर जायला लावू नका पोल खोल करून टाकू……..
आणि हो ते पन्नास खोके बाकी ओके हा विषय कोणी विसरलेलं नाही..
पुन:श्च एकदा आपण केलेला विधानांचा आम्ही संपकरी जाहीर रित्या निषेध करतो.