दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा नांदेड बिदर रेल्वे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भारतीय जनता पार्टी देगलूर च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अवकाळी पाऊस व गारपिटी ग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सरकारत्मक निर्णय घेईल असे सांगितले.
त्यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते भगवान श्रीराम नवमी निमित्त भव्य कार्यक्रमाचे नियोजन जाहिरातीचे अनावरण करण्यात आले त्यावेळी भारतीय जनता पार्टी देगलूर चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
