दैनिक चालु वार्ता खंडाळी सर्कल-संतोष भस्मपुरे.
अहमद्पुर:तालुक्यातील सुमठाणा येथे दि 14मार्च पासून श्री संत बाळू मामा देवस्थान आयोजित अखंड हरीनाम सप्ताह याचं आयोजन केल आहे.तरी 19मार्च रोजी बारामती तालुक्यातील बाळूमामाचे सेवेकरी,तथा बाळू मामाच्या चरित्राचा अभ्यास असलेले परमसिद्धी ज्ञानी,अनेक वर्ष देश सेवेत कार्य करून नंतर बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतून घरात घरात पोहचलेले,बाळूमामाच्या मालिकेतून प्रेरणा घेत मला पण पूर्ण आयुष्य बाळूमामच्या सेवेत त्यांचं चरित्र पूर्ण जगभर पोहचवायचंय हा ध्यास घेऊन आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून बाळूमाच्या सिद्धिअवताराचा जागर पूर्ण महाराष्ट्र भर पोहचवत असताना सुमठाणा गावातील देवस्थान ट्रस्ट न विनंती केली आणी प्रवचनकार,अभिनेते,मेजर विक्रम सुरेश जगताप सुमठाणा नगरी मध्ये आले तेंव्हा सर्व सुमठाण्यातील युवकांच्या वतीने त्यांचा सन्मान तथा सत्कार मष्णाजी पोले यांच्या स्वगृही करण्यात आला.त्या प्रसंगी म.पोलीस शरद पोले,वनरक्षक कृष्णा पोले,आर्मी गणेश पोले,पत्रकार विष्णु पोले,युवा नेते तथा पत्रकार नंदराज पोले,भरत पोले,राठोड संदीप,गुंडेराव पोले,सुधाकर पोले,सचिन सूळ, तेजेराव पोले,बबलू पोले,रोहिदास सुरनर,हणमंत पोले,नागनाथ पोले,संदीप मुसळे आणी इतर सर्व युवक उपस्थीत होते.
