
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांची युवा सेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे,शिवभक्त रोहीत भडके यांनी पुष्पगुच्छ देत सदिच्छा भेट घेतली
भुम:-महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच धाराशिव चे पालकमंत्री मा.ना.प्रा.डाँ तानाजीराव सावंत साहेब यांची सदिच्छा भेट युवा सेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे,शिवभक्त रोहित भडके पुणे येथे घेतली.
शिक्षण, रस्ते, पाणी, आरोग्य तसेच सर्व सामाजिक प्रश्नांसाठी सदैव कार्यतत्पर असणारे कर्तव्यदक्ष विकास रत्न आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब भू म – परंडा – वाशी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आधुनिक पावलं उचलली आहेत. मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे निष्ठावंत युवा कार्यकर्ता म्हणून तर युवा पिढीचे आदर्श व्यकतिमत्त्व म्हणुन भूम शहरासह ग्रामीण भागात प्रभाकर शेंडगे यांची ओळख आहे. त्यांचे समाजकार्य उल्लेखनीय असून युवा पिढी त्यांचा आदर्श आहे. सामाजिक हित जोपासत खेड्यापाड्या वस्तीमध्ये तसेच ग्रामीण भागात आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे कार्य पोहोचवण्याचं काम ते करत असून त्यांनी व त्यांचे सहकारी यांनी तालुक्यांमध्ये १०० शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड पोहोचवण्याचं काम मोलाचे केल्यामुळे त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.भूम परंडा वाशी या तालुक्यातील शाळांना डिजिटल बोर्ड पोचवल्यानंतर युवा शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे यांचा सत्कार मुख्याध्यापक,पालक व विद्यार्थ्यांनी केला. आरोग्य मित्र ते आरोग्य धुत म्हणूनही काम त्यांचे मोलाचे आहे.यावेळी कौतुकाची थाप आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी दिली.