
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील हळदगाव येथील विष्णू गुंड व प्रशांत सावंत यांच्या शेतातील जनावराच्या कोट्यातून सुमारे 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी करणाऱ्या चोरट्यास येरमाळा पोलिसांनी 12 तासाच्या आत गजाआड केले या चोरट्याकडून जर्सी गाई जप्त केले आहेत.
हळदगाव येथील शेतकरी विष्णू गुंड व प्रशांत सावंत यांनी शेतातील आपल्या गोठ्या समोर जर्सी गायी बांधल्या होत्या त्या गायी दिनांक 15 मार्च 16 मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याची फिर्याद येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली या प्रकरणाची गंभीर दखल घेत कळंब उपविभागीय पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम .रमेश यांच्या सूचनेनुसार येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी गाव कामगार महेश पांचाळ यांनी दिलेल्या माहितीवरून तात्काळ बिट अधिकारी प्रकाश चापेकर यांना सदर गायी चोरांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून मिळालेल्या माहिती वरून हळदगाव ,सातेफळ, सौंदाना ,येडशी शिवारामध्ये शोध मोहीम राबविण्यात आली दरम्यान पोलीस हवालदार चाफेकर यांना मिळालेल्या माहितीवरून हळदगाव येथील सतीश अभिमान सावंत यांनी जर्सी गाई चोरी केली असे संशय आला याची खात्री करीत शोध घेतला असता सतीश सावंत हे सातेफळ सौंदाना रस्त्यावरील तेरणा नदीच्या पुलावर चोरीस गेलेल्या गायी घेऊन जात असताना मिळाला
ही कारवाई धाराशिव (उस्मानाबाद) पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांच्या नेतृत्वाखालील येरमाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनकर गोरे प्रकाश चापेकर दत्तात्रेय राठोड परमेश्वर कदम गृह रक्षक दलाचे जवान महिंद्र यांनी केली