
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील उळूप येथे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्हाचे पालकमंत्री प्रा. डॉ तानाजीराव सावंत यांचा स्वखर्चातून विकासरत्न ना.प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठाण यांचा माध्यमातून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती टप्पा -४ उळूप येथे मंत्रीमहोदय विकासरत्न ना.प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत यांचा मार्गदर्शनाखाली नदी खोलीकरण व सरळीकरण चे काम सुरू करण्यात आले. यावेळी शेतकरी वर्गातून आनंदाची वातावरण असून गाव पाणीदार होणार आहे. यावेळी सरपंच विनोद वरळे,विविध कार्यकारी सोसायटी सदस्य मच्छिंद्र वरळे, बाबासाहेब भोसले, विठ्ठल उंबरे ,परमेश्वर काळे, भागवत सानप, शामराव पाटील, विठ्ठल शेळके ,संदिपान वरळे ,सर्जेराव शेळके ,उद्धव कळकुटे , सुधीर वरळे, गणेश वाघमारे, किसन गाडे, जालिंदर पालवे, ज्ञानेश्वर सानप , किसन जाधव, हरी वरळे, नवनाथ जाधव, पोपट गजरे, तसेच गावातील तरुण ,लहान मुले यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून विकासरत्न प्रा डॉ तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख धाराशिव अर्चनाताई दराडे, तालुकाप्रमुख वाशी सत्यवान गपाट सर, चिंचोली गणप्रमुख दत्तात्रय काळे, युवासेना विभाग प्रमुख प्रमोद शेळके ,सरपंच विनोद वरळे ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पांडुरंग धस,मा सरपंच तानाजी कोलते, व इतर मान्यवर उपस्थित होते.