
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
परतुर. प्रकाश सोळंके जिल्हाध्यक्ष जालना मा.मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत दि,२४ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन निवेदनात म्हटले आहे कि, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी आपला देश महासत्तेकडे जावा म्हणून रात्रंदिवस काम करत आहेत, परंतु एक अधिकारी त्यांचे हे स्वप्न भंग करण्याच्या दिशेने काम करीत आहेत,या स्वप्न भंगाचा नवीन हा एक राष्ट्रीय महामार्ग ५४८ ते येणोरा.माव.पाटोदा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी मे साई कंट्रक्शन जालना यांनी दिले होते २४ मार्च २०२३ रोजी मुदत संपली, या रा.मा. क्रमांक २२३. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत काही दिवसांपूर्वी केलेले दीड कि.मि.काम न करता पैसे उचलून घेतले होते याची मा. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे तक्रार केल्या नंतर चौकशी झाली रस्त्याचे काम केले नाही म्हणून समोर आले नंतर या दीड किलोमीटर रस्त्याचे काम झाले तेच काम या पाच किलोमीटर कामांमध्ये समाविष्ट केले, तसेच दुसऱ्या कामावरील वापरलेली खराब खडी वापरलेली आहे त्या खडी डांबर लागलेले आहे, म्हणून ते रॉ मटेरियल या रस्त्यावर वापरले, खराब कामाला सहकार्य केले म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक कार्यालय जालना, कार्यकारी अभियंता जालना,सौ सविता काथारे-शेलकर,उप अभियंता श्री मस्के,कनिष्ठ अभियंता यांना बडतर्फ करून, या रस्त्याच्या बोगस कामाची पाहणी मा.जिल्हाधिकारी साहेब जालना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी संयुक्त पाहणी करून तसेच या बोगस रस्त्याच्या कामाला सहकार्य केले म्हणून क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करून कारवाई करण्यात यावी घेती कारवाई न झाल्यास या रस्त्यावरती या रस्त्यावरून दळणवळण करणाऱ्या लोकांना घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा इशारा हि निवेदनात देण्यात आलेला आहे…