
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील
मानसी गावच पुनर्वसन होउन आज १२ वर्ष उलटून गेली असता नानसी गावाला पाण्याची टाकी बांधण्यात आली मात्र पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन नळ जोडणी झाली नसल्याने नानसी गावात ८ वर्ष झाले पण्याची टाकी बांधली आहे पण पाण्याच्या थेंब गावात आला नाही
गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी दिल्या आहेत,तरी
पण नानसी गावच्या पाणी प्रश्न सुटला नाही. नानसी गावचे रहिवासी मारोती आसाराम बोने, यांनी पुढाकार घेऊन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना ऐका ईमेल द्वारे सविस्तर गावच्या पाणी पुरवठा समस्या बद्दल एक निवेदन पाठवलेआहे. कोळी महा संघाचे मंठा तालुका अध्यक्ष पांडुरंग बोने बांनी देखील आपल्या गावातनळ व पाईप लाईन केलेली नाही अशी तक्रार वारंवार मंठा नगर पालिका केली पण काहीही परिणाम झाला नाही. पाण्यासाठी गावकर्यांचे खूप हाल होतात, पाणी टँकरने विकत घ्यावं लागतं आणखी किती दिवस पाणी विकत घ्यायचं आहे असा प्रश्न गावकरी मंडळीं समोर आहे.