
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- ज्ञानेश्वर साळुंके
जालना जिल्ह्यांतील अंबड तालुक्यांतील भाडी येथील जमिनीच्या वादातून एका १८ वर्षांच्या सावत्र भावानेच ८ वर्षीय सावत्र भावाचा केला शेवट… याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन भांडीं येथील तुकाराम कुढेकर यांची पाहिली पत्नी रेखा ही काही कारणास्तंव पती तुकारामला सोडून गेल्यांने तुकाराम कुढेकर याने कावेरीसोबत दुसरे लग्न केले. पहिल्या पतीपासून झालेला मुलगा ऋषिकेश ( वय १८) हा आई रेखा सोबत छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यांस होता. तर तुकाराम याची दुसरी पत्नी कावेरी हिच्यापासून झालेला मुलगा विराज (वय ८) हा भाडीं येथे आई-वडिलांसोबत राहत होता. मात्र तुकाराम यांच्या पहिल्या पत्नीने शेतजमीन वाटून घेण्यावरुन कोर्टात त्यांचा चांगलाच वाद सुरु होता. तसेच पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश हा आता सज्ञांन झाल्यांने गावाकडे अधूनमधून येत असेल व तो आईच्या सांगण्यावरुन वडिलांना जमीन वाटून देण्याविषयी मागणी करीत होता. दिनांक २३ मार्च रोजी गुरुवारी ऋषिकेश याने आपल्या म्हणजेच सावत्र लहान विराजला गोडगुलाबीने बोलून डाव्या कालव्यांत बाजूच्या शेतात नेले तिथे रुमालाने विराज याचा गळा आवळला. गळा आवळूनही तो मरत नाही असे त्याला वाटल्यांने त्याने त्यांच्या नाकातोंडात चिखल कोंबून श्वांस गुदमरुन तडफडत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मी माझ्या भावाला शेतात मारुन टाकले असे वस्तीवर येवुन सवंगड्याला सांगून व मारल्यांचे ठिकाण दाखवून सायकलवरुन त्यांने तेथून पळ काढला. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी ऋषिकेश याला पोलिसांच्या ताब्यांत देण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्यासह वरिष्ठ गोदीं पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी आपल्या ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांंसमवेत भाडीं येथे घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यावरुन फिर्यादी मयत विराज याची आई कावेरी तुकाराम कुढेकर यांनी गोदी पोलीस ठाण्यांत आरोपी ऋषिकेश व त्याची आई रेखा यांच्या विरोधांत गुन्हा दाखल केला.