
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई —दि. २४ मार्च हा जगभरात “जागतिक क्षयरोग दिवस” म्हणून साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. भास्कर खैरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिक्षक मा. डॉ. राकेश जाधव उपस्थित होते. सर्वप्रथम टीबी या आजाराचा शोध लावणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ भास्कर खैरे यांनी क्षयरोगा विषयी समाजात असणारे समज गैरसमज आणि भीती याबद्दल मार्गदर्शन केले. सर्वांनी एकत्र येऊन या क्षयरोगाला आपण हद्दपार करू शकतो असे मत व्यक्त केले. तसेच क्षय रोगासाठी काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मा. अधिष्ठाता यांनी कौतुक केले. त्यानंतर श्वसनविकरशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.अनिल मस्के सर यांनी क्षयरोगाविषयी अत्यंत सोप्या आणि समजेल अशा भाषेत उपस्थित रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना क्षयरोगाबद्दल माहिती दिली. हा आजार कशामुळे होतो, याची लक्षणे व उपचार पद्धती इ. विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने देखील “होय, आपण क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करू शकतो असा नारा दिला आहे”. यानंतर सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. भाऊसाहेब मुंडे ,सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप निळेकर, डॉ. एस. एस. चव्हाण व नि. वै. अ. डॉ नागेश अब्दागिरे क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयसीटीसी चे समुपदेशक श्री. धनराज पवार यांनी केले. डोट्स चे श्री खडके सर, कलमे मॅडम, कृष्णा ब्रदर ,श्रीमती सुनिता किसते मॅडम , आयसिटीसी चे प्रयोगशाळा तंत्रज्ञ विश्वास लवंद , ए आर टी केंद्राचे गडदे, अशोक कसबे, अनिता कांबळे, सुखदा सोनवणे, संध्या चाटूफळे आणि क्षयरोग कक्षाच्या श्रीमती खिस्ती मॅडम, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री कृष्णा ब्रदर यांनी केले.