दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी .
देगलूर :तालुक्यातील मरखेल येथील जेष्ठ महिला नागरिक श्रीमती इंदिराबाई गंगाधरराव मालीपाटील यांचे काल शनिवारी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्ष होते.
आज रविवार १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता मरखेल येथील स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात २ मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
देगलूर येथील श्रीराम सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मनोरहराव मालीपाटील यांच्या त्या मातोश्री होत.
