दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर:-
आयोजन करून महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शेतकरी बाधवांसाठी खास सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा मौजे इस्लापुर,शिवणी येथे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या मारोती लोखंडे, नंदकुमार गादेवार, मारोती खोकले, बालसिंग चौफाडे, शंकर टारपे,श्रावण भुसारे,संतोष फरास,कांबळे,गणेश जयस्वाल,केशव थळगे, दिलीप रायपलवार, रामराव जाधव, रामेश्र्वर जाधव,भोज्जु रेड्डी,श्रीधर लोक्कावार या नियमित कर्जफेड करणाऱ्यां शेतकर्यांचा शाखा व्यवस्थापक श्री राहुल बेंदुले,सहाय्यक व्यवस्थापक शुभम रामटेके,कर्मचारी मोहन पाथोडे,उत्तम गायकवाड यांनी शाल, श्रीफळ,हार देवुन नुकताच सत्कार केला.या कार्यक्रमाचेअध्यक्ष संतोष फरास होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप रायपलवार,केशव थंळगे होते.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केशव थंळगे म्हणाले की, पिककर्ज घेतलेल्या सर्व शेतकर्यानी वेळेत कर्ज परत फेड केल्यास शासनाकडुन व्याज परत मिळते आपले खाते एन.पी.मध्ये गेल्यास साडे बारा टक्के व्याज लागते आहे.वेळेत परतफेड केल्यास सात टक्के व्याज लागते.एक वर्षाचा आत आपण पीककर्ज भरलो,तर आपणास व्याजाची सवलत मिळते व आपली बॅकेत पत असते.एखादा शेतकरी जमीनीच्या तंतोतंत कर्ज घेते आणि त्यातली काही जमिन मुलांच्या नावाने करतात.अश्या वेळी आपले खाते परत नियमित करून योजनेचा लाभ घ्यावा असे ही ते म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅकेचे बी.सी.गणेश जयस्वाल यानी केले,तरआभार शाखा व्यवस्थापक राहुल बेंदुले यांनी मानले आहे.
