दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी – अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): तालुक्यातील ग्रा.पं.थारचे उपसरपंच संदीप परतेती व वडील माणिकराव परतेती यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने उपसरपंच पदावरून पायउतार होत ग्रा.पं.सदस्य राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे तर उपसरपंच संदीप परतेती वडीलापासून विभक्त राहत नसल्याने ते अतिक्रमित जागेचा उपभोग घेत असल्याचे सिध्द झाले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी वर्धा यांनी १८ एप्रिल रोजी अपात्रतेचा आदेश दिला आहे त्याअनुषंगाने तालुक्यात राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे याबाबत असे की,विभागीय आयुक्त नागपूर यांनी ३०/९/२२ च्या आदेशाप्रमाणे तत्कालीन जिल्हाधिकारी वर्धा यांच्याद्वारे पारित केलेले आदेश २३/६/२२ रोजी रद्द करून अपिलार्थी संदीप माणिकराव परतेती यांचे विवादित अतिक्रमण संबंधाने विक्रीपत्राबाबत पडताळणी करून अपिलार्थी यांना रीतसर पूर्वसूचना/ नोटीस देवून नव्याने चौकशी करून चौकशी अहवालावर कनिष्ठ न्यायालयात अपिलार्थी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन नव्याने आदेश पारित करणेसाठी निर्देश केल्याप्रमाणे सदर प्रकरणात नव्याने चौकशी करून संबंधितांना योग्य संधी देऊन सुनावणी घेण्यात आली त्यानुसार जिल्हाधिकारी वर्धा यांनी अर्जदार अरुण घोडीले(४९) यांचा अर्ज मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी प्रशांत एकनाथ धुडे विरुद्ध अप्पर आयुक्त नाशिक रीट याचिका क्र.६४०८/२०२१ निर्णय दिनांक ५/१/२२ रोजी दिलेल्या निकालाच्या आधारे मान्य करून गैरअर्जदार १ संदीप परतेती(३८) यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४(१) ज (३) प्रमाणे ग्रा.पं.थार येथील ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे
