
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद खडकेश्र्वर येथे प्रती वर्षा प्रमाणे यंदाही वीरभद्र मंदिरात महा नायक क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९२ व्या जन्म उत्सव निमित्त दि.२२/०४/२०२३ रोज शनिवार ११.०० वाजता गावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा बोधने, तमप्पा गंदिगुडे,युवा नेते दिनेश आप्पा आवडके, शासकीय अधिकारी API भालचंद्र तिडके व PSI गजानन काळे, तसेच मुक्रमाबाद येथील सरपंच सौ.अंजीताताई बालाजीअप्पा बोधने, ग्रा.प.सदस्य बालाजीअप्पा बोधने, बालाजीअप्पा पसरगे, हेमंत अप्पा खंकरे, बालाजी खंकरे, सुरेश अप्पा पंचाक्षरे, नागनाथ थळपत्ते, यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करुन प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. नवीनच रूजू झालेले
ए.पी.आय.भालचंद्र तिडके व पी.एस.आय.गजानन काळे शासकीय अधिकारी यांचे वीरभद्र मंदिराचे पुजारी पत्रकार तथा भाजपा समर्थक मंच युवा मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बस्वराज स्वामी वंटगिरे यांच्या कडुन सत्कार करण्यात आले.यावेळी महादेव मंदिर पुजारी राचय्या स्वामी, ग्राम विकास अधिकारी शुभम भंगे,सूरज खळुरे, मनसेचे अमीत पंचडे, गणेश खंकरे, शिवसेना शहरप्रमुख सदानंद घाळे,राहुल खंकरे, हरी ओम गळगे, संकेत भंगे,रोहीत गोकुळे,राहुल गोकुळे,करण बनबरे,आकाश देवकत्ते,कपील कल्पे,विनोद बगारे,शुभम थळपत्ते,राजु माळशट्टे,सोमेश देवने, यांनी ही महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले.तसेच ग्राम पंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय शाळा महाविद्यालये इतर ठिकाणी बसवेश्वर जयंती उत्सव साजरी करण्यात आले.