
दैनिक चालू वार्ता उपसंपादक मराठवाडा- ओंकार लव्हेकर
धर्मापुरीचे चेअरमन आदरणीय सुधाकर लोखंडे पाटील यांची मुलाखत दैनिक चालू वार्ताचे मराठवाडा उपसंपादक ओंकार लव्हेकर यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांची मुलाखात घेण्यात आली.त्यांनी आपले जीवन कसे संघर्षमय गेले व आजचे जीवन कसे आनंदात आहे असे जीवनाचा चित्रपट सांगत असताना कंठ भरून येत होता. पण आज घडीला मी कष्ट केलो म्हणून माझी दोन्ही मुले रत्ना सारखी आहेत असे त्यांनी मत व्यक्त केले.
माझ्या जीवनामध्ये खरा साथीदार माझी पत्नीच होती . कारण तिने माझ्या सुखात आणि दुःखात बरोबरीने साथ दिली त्यामुळे मला तिचा स्वाभिमान वाटतो.
मी दूध विकण्यापासून ते चेअरमन कसा झालो याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी त्यांच्या जीवनात जे खरे मित्र संकटात देतात .तेच खरे मित्र असतात असे मत व्यक्त केले.
यावेळी दैनिक चालू वार्ताचे तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड आणि गणपत भालेराव उपस्थित होते.