
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- दक्षिण भारतातील सुधारणावादी महापुरुष महात्मा बसवेश्वर यांची 905 वी जयंती अहमदपूर येथील छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप नी आज दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी योगा मैदानावर सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी केली. या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री अशोक चापटे सर हे होते तर प्रमुख पाहुणे धर्मापुरी येथील प्राध्यापक भगवान अमलापुरे हे होते. मान्यवराकडून आणि उपस्थितता कडून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे श्री डी एस वाघमारे, ह भ प संजय महाराज नागपूरने, श्री माधव तिगोटे सर ,मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष श्री अशोक चापटे सर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याबद्दल सखोल माहिती दिली.
अशोक चापटे सरांनी सांगितले की महात्मा बसवेश्वर यांचे कार्य बहुजन समाजासाठी लाखमोलाचे असून त्यांच्या कार्याची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत गेली पाहिजे. महात्मा बसवेश्वरांना जातीच्या चौकटीमध्ये बसवणे हे योग्य नसून त्यांना संताचा दर्जा देणे हेही योग्य नाही. बाराव्या शतकामध्ये त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात प्रचंड लढा उभा केला होता आणि अनेक सुधारणावादी कार्य केले होते म्हणूनच समाजाने त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. भारतात आजपर्यंत चारच महात्मे होऊन गेलेले असून पहिले महात्मा हे महात्मा गौतम बुद्ध असून दुसरे महात्मा हे महात्मा बसवेश्वर आहेत असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या जयंती महोत्सवाचे संचलन छत्रपती शाहूराजे युगा ग्रुप चे अध्यक्ष एन डी राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी शिक्षणाधिकारी श्री हिरामणी धसवाडीकर यांनी आभार मानले