दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा शहरातील बडेसाब दर्गाचा सर्वागिन विकास केल्याबद्दल लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचा २२ एप्रिल २०२३ रोजी रमजान ईदच्या पवित्र दिवसी लोहा शहरातील मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या बडेसाब दर्गा येथे लोहा शहराच्या परंपरेनुसार टोपी दस्ती व खारीक खोब-याचा हार घालुन भव्य सत्कार करन्यात आला .
यावेळी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले,नगरसेवक नबीसाब शेठ,नगरसेवक संदिप सावकार दमकोंडावार,नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक केतन खिल्लारे,लोहा न.पा.कर्यालयीन अधिक्षक उल्हास राठोड,माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष युवराज वाघमारे, जेष्ठ आंबेडकरी चळवळीचे गंगाधर महाबळे, संजय चव्हाण, माजी सरपंच भिमराव पा शिंदे,निहाल मंन्सुरी,सहशिक्षक बालाजी आरसुलवाड, पोलिस मिडीया क्लब चे तालुकाध्यक्ष विलास सावळे, प्रेस संपादक पत्राकर संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पा.पवार, यांच्यासह शहरातील सर्व मशिदीचे मौलाना व मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थीत होता.
सत्काराला उत्तर देतांना लोहा न.प.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी म्हणाले की लोहा शहरातील मुस्लीम बांधवासह सर्व समाज घटकांचा विकास लोहा न.पा.च्या माध्यमातून करणार व यासाठी आमदारासह वरिष्ठांचीही मदत घेणार.तसेच पुढे बोलतांना नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी म्हणाले की आपण आज ईदच्या दिवशी येथे एक कार्यक्रम घ्यावा मुस्लीम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे काय काय करीत आहोत ते सांगावे तसेच आज दुसरी एक दुख:द बातमी कळाली की युनुस शेख यांचे वडील वारलेत युनुश शेख यांचे वडील मैनू शेख हे आमच्या सुर्यवंशी कुटूबाच्या फार जवळचे होते.त्याच्या निधनाची वार्ता समजदाच तीव्र दुख झाले मैनूभाई यांच्या निधना बदल मी माझ्या सुर्यवंशी कुटूबीयांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो व ईश्वर त्यांच्या कुटूबियांना या दुखातून सावरावे अशी प्रार्थना करतो .लोहा न.पा.त मी आपल्या सर्व जनतेच्या आर्शिवादाने २००४ पासुन निवडून येत आहे. नगरसेवकाला काही मर्यादा असतात इच्छा असुन देखील त्या वेळेस कामे झाली नाहीत मी नगरसेवक असतांना बडेसाब दर्गाच्या घुमटासाठी १० लाखाचा निधी आणुन काम केले.व आता मी आपल्या सर्वांच्या आर्शिवादाने नगराध्यक्ष झालो आहे त्या बदल मी सार्वांचा आभारी आहे. आता लोहा शहराचा विकास करणे माझ्या हातात आहे लोहा शहराचा विकास हा सर्व जाती धर्माच्या
नागरीकांना सोबत घेऊन केला आहे यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविला आहे, जैन मंदिर बांधले आहे,लिंगायत समाज बांधवाच्या स्मशानभूमी साठी जागा घेऊन विकास कामासाठी आता ६७ लाख रुपये निधी मंजुर केला आहे ,दलित वस्तीत कलालपेठ मधील सर्व कामे पुर्णकेले आहेत, तसेच तांडा वस्तीत कामे झाली आहेत.बडेसाब दर्गा येथे ३५ लक्ष रुपयाचे पुलाचे काम केले आहे. तसेच बडेसाब दर्गा येथे कंम्पाऊंड वॉलच्या कामासाठी आमदाराची मदत घेऊन काम होत आहे तसेचे नमाज वटयाचे ही काम होत आहे.यासाठी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजुर केला आहे.तसेचे भोई गल्ली पर्यंत सिमेंट रस्त्योच काम होणार आहे.तसेच इंदिरानगर येथील मशिदिच्या रस्त्यासाठी विकास कामांसाठी ६७ लक्ष रुपये मंजूर केले आहेत.एकत्रीत यंदा लोहा शहराच्या विकासाठी ३.५ कोटी रुपयाचे विकास कामे मंजूर केले आहेत. ईदच्या पवित्र दिवशी सांगतो आपले काही प्रश्न असतील ते माझ्याकडून व माझ्या वरिष्ठांकडून मदत घेऊन सोडविले जातील असे नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी म्हणाले.
तसेच यावेळी नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या वतीने लोहा शहरातील सर्व पाचही मशिदीच्या मौलानांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या वतीने रमजान ईद निमित्त लोहा शहरातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते व यावेळी स्वादिष्ट शिरकुबां व बिर्याणीचे जेवण देण्यात आले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक नबीसाब शेख यांनी परिश्रम घेतले.
