दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
तालुक्यातील दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील ५ किमी अंतरावर असलेल्या तोंडसुरे गावातील गरीब कष्टकरी कुटुंबातील श्री व सौ.शिल्पा सुनिल शिगवण यांची कन्या श्रुती सुनिल शिगवण हिने नुकत्याच पार पडलेल्या राज्य स्तरीय पोलिस भरती परीक्षेत घवघवीत यश मिळवून रायगड पोलिस निवड यादीत स्थान मिळवले आहे.श्रुती हिचे इयत्ता पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्हा परिषद शाळा तोंडसुरे येथे तर इयत्ता १० वी आणि १२ वी चे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे झाले आहे.अध्यापना बरोबरच खेळा मध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या श्रुती शिगवण हिने कुटुंबातील गरिबिवर मात करून कमांडो अकॅडमी माणगाव येथुन रायगड पोलिस भरतीत ग्राउंडमध्ये ५० पैकी ४३ तर लेखी परीक्षेत १०० पैकी ७८ गुण मिळवुन पास होत रायगड पोलिस पदी निवड झाली आहे.श्रुती हिने गरिब परस्थितीवर मात करत जीवनात आदर्श प्राप्त करावा ह्या हेतुने पोलिस भरतीत यश मिळविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला.सदरचा यश मिळविण्यासाठी आई वडील,गुरुजनवर्ग आणि ग्रामस्थ यांनी केलेले मार्गदर्शनाचे जोरावर जिद्द आणि चिकाटीने केलेली मेहनत अखेर फळास आली असल्याचे मत व्यक्त केले आहे.म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भगातुन एकमेव श्रुती शिगवण हिने वरील यश संपादन केले असल्याने तीचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
