
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लोहा शहरात बसवावा अशी अनेक वर्षांपासून तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांची आग्रहाची मागणी होती,डॉ. बाबासाहेबांचा पुतळा लोहा शहरात बसवण्यासाठी सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून लोहा येथे सन २००४ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती स्थापन करण्यात आली, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत व विविध परवाग्या व ना- हरकती कायदेशीररित्या उपलब्ध करून घेतल्या, हे करत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, तब्बल २० वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर लोहा शहरात बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाने रीतसर मंजुरी दिल्यामुळे दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा लोहा येथे बसविण्यासाठी येत असताना काही जणांनी श्रेयवादासाठी प्रशासनाच्या सहकार्याने हा पुतळा अडवल्याने लोह्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता, ही माहिती कळताच माजी सनदी अधिकारी तथा लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या मध्यस्थीने व लाखमोलाच्या सहकार्यानेच कायदेशीर रित्या लोहा शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसला गेला याचा मला सार्थ अभिमान असून शिव, शाहू ,फुले आंबेडकर विचारांचे वारसदार असलेल्या आ.श्यामसुंदर शिंदे व आशाताई ताई शिंदे यांचे मी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती लोहाच्या वतीने जाहीर आभार व अभिनंदन करत असल्याचे पुतळा समितीच्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका श्रीमती पुष्पलता शंकरराव कापूरे यांनी दि. 23 रोज रविवारी लोहा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले,डॉ. बाबासाहेबांचा पुतळ्याचा चबुतरा २० फूट असून पूर्णाकृती पुतळ्याची उंची ही १२ फूट आहे. लवकरच पुतळा परिसरात अत्याधुनिक पद्धतीचे सुशोभिकरण व सौंदर्यकरण करून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे मोठ्या उत्साहात लवकरात लवकर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार असून बाबासाहेबांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी आ.श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भरीव निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती पुष्पलता कापूरे यांनी पत्रकार परिषद बोलताना सांगितले .माझे पती कालवश शंकरराव रानबाजी कापुरे यांचे डॉ. बाबासाहेबांचा पुतळा लोह्यात बसवण्याचे स्वप्न होते व त्यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य मला वेळोवेळी लाभले असून माझे पती शंकरराव कापुरे हे माझे गुरु व माझे मार्गदर्शक होते त्यांच्या सहकार्यामुळेच मी लोहा शहरात बाबासाहेबांचा पुतळा उभारावा म्हणून निर्भीडपणे काम करू शकले असे पुतळा समितीच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता कापुरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, यावेळी या पत्रकार परिषदेस श्रीमती सुनंदाताई माधवराव कापुरे, रवी कापुरे, मनीषा सावळे, अश्विनी कापुरे सह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.