
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
माझ्यासोबतच शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला चाकूने भोसकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चारचाकी गाडीतच बेदम मारहाण झाल्याचा प्रकार लक्ष्मी कॉलनी येथील बारापुल्ला गेटजवळ घडला. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात राजकीय नेत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबादमधील लक्ष्मी कॉलनीतील बारापुल्ला गेटजवळ घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जयकिशन कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कांबळे याने महिलेला त्रास देत शरीरसुखाची मागणी केली. याला विरोध केल्याने महिलेला बेदम मारहाण केल्याची नोंद महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये आहे.
बलात्काराचा गुन्हाही दाखल
दरम्यान आरोपी जयकिशन कांबळे हा एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता. त्याच्या विरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणात अटक झाल्यानंतर कांबळे हा जामिनावर सुटलेला आहे. बलात्काराचा गुन्हा नोंदविताच संबंधित पक्षाने हकालपट्टी करणारे पत्रही काढले होते.