
दैनिक चालु वार्ता भूम प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:- समाज संघटीत राहण्यासाठी सर्वानी एकत्र येणे काळाची गरज आहे,तरच समाजापुढे आसलेले प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल असे बार्शी येथील प्रसिद्ध नारदिय किर्तनकार प्रसाद सहस्रबुध्दे यांनी सांगीतले. दि २२ रोजी भूम येथील ब्राम्हण समाज बांधवांच्या वतीन भगवान परशुराम जयंती सोहळ्याच अयोजीत करण्यात आलेल्या किर्तनात बोलत होते.
यावेळी किर्तनकार प्रसाद सहस्रबुद्धे ह भ प अरुण शाळु ,तालुका ब्राम्हण संघटना अध्यक्ष सुधिर देशमुख, शहर अघ्यक्ष अँड संजय शाळु यांच्या हस्ते भगवान परशुराम प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या नंतर प्रसाद सहस्रबुद्धे यांचे किर्तन होवुन सायंकाळी ६ वाजता जोरदार अतिषबाजी करत फुले उधळून जन्म सोहळा साजरा करण्यात आला.या नंतर महाआरती घेण्यात आली. कसबा विभागात श्री भगवान परशुरामाची पालखीतून ढोलताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये महिलांनसह समाज बांधव सहभागी झाले होते.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली व प्रसाद म्हणुन दुध वाटप करण्यात आले.या जयंती सोहळ्यासाठी शहरातील ब्रम्हवृदांनी हजेरी लावत हा सोहळा यशस्वी केला.