
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी- ज्ञानेश्वर साळुंके
खरपुडी ता जालना येथे दि.25/04/2023 वार.मंगळवार रोजी ठीक सकाळी 10:00 वाजता खरपुडी गावात अनंत श्रीविभुशित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भव्य व दिव्य असा संत संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु श्रींच्या पालखी मिरवणुकीने होईल त्यानंतर ऑनलाईन संतसंग व खास नाणीज धाम येथून आलेल्या ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ. योगीताताई सोनवणे यांचा अमृततुल्य असा प्रवचनाचा कार्यक्रम होईल यामधे 21व्या शतकात आध्यात्माची आवश्यकता काय?अध्यात्म,विज्ञान,आणि व्यवहार या त्रिसुत्रीचा वापर करून जीवन कसे सुखमय जगता येईल,भक्ती म्हणजे काय?भक्ती कशी करावी?असे सविस्तर मार्गदर्शन होईलआणि नंतर महाप्रसाद होईल. तरी यासुवर्ण संधीचा सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील स्वामीभक्त, सर्व जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती,संतसंग सेवा समिती,संग्राम सेना,युवासेना, महिलासेना,सर्व आजी माजि पदाधिकारी यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जालना तालुका सेवा समितीच्या जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले