
दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन अर्थात मुप्टा शिक्षक संघटनेची बैठक आज दि. 23.04.23 रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे विभागीय सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव प्रा. सुनील भाऊ मगरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुप्टा शिक्षक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर वाहुळ यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत मार्गदर्शन पर भाषण करताना प्रा.सुनील मगरे म्हणाले की जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजे जसे की जीपीएफ, शालार्थ आयडी, शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता जुनी पेन्शन योजना व संच मान्यता संदर्भातले प्रश्न ताबडतोब सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतील सदरील तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यासाठी सज्ज राहण्यास ही सांगितले. बैठकीस उर्दू मुप्टा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा.डॉ.समीउल्ला खान , प्रा.डॉ. भास्कर टेकाळे विभागीय कार्याध्यक्ष संभाजीनगर, प्रा.मूकबूल शेख,मुप्टा शिक्षक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा.जालिंदर वाहुळ , जिल्हा सरचिटणीस प्रा .डॉ. डी. आर.नागरगोजे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा .सुभाष हिवराळे पाटील , जिल्हा सहसचिव प्रा.शंकर पवार, जिल्हा संघटक प्रा. डॉ. चंद्रकांत कुऱ्हाडे, व जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी प्रा .राजाभाऊ बनसोडे यांची मुप्टा शिक्षक संघटनेच्या विभागीय सचिव शिक्षण उपसंचालक विभाग लातूर पदी नियुक्ती करण्यात आली.