दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
दि 23 एप्रील ( पिंपळे गुरव चिंचवड पुणे )
पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रातील महाराष्ट्रातील विविध जिल्हातून शिक्षणासाठी आलेल्या विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन त्याचा आनंद द्धिगुणीत केला.
मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथश्रमात व ममता अंःध कल्याण केंद्रात जाउन त्यांना स्नेहभोजन बरोबरच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित आसतात .
आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून तेथील विशेष. मुलांना एक दिवस आनंदाचा यामाध्यमातून स्नेहभोजनाचा आस्वाद दिला . मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंद झाल्याचे समाधान मिळाले असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले. आम्ही सर्व घरातील सर्व सदस्यांनी पण मुलांबरोबर स्नेहभोजनचा आनंद घेतला.मुलांनी आम्हाला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.
यावेळी विशेष मुलांनी आपआपली मनोदय व्यक्त करून आमचे काही सहकारी प्रथम वर्ग आधिकारी झाल्याचे सांगितले व आम्ही असे अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत राहून जनसेवा करणार असल्याचे विद्यार्थी यांनी सांगितले .काही मुलांनी आम्हाला वेगवेगळ्या आस्थापना आमच्या जागा शिल्लक आसतांना आम्हाला डावलले जाते अशी खंत व्यक्त केली.काही मुलांची वेगवेगळ्या राजकीय तसेच चित्रपट अभिनेते या हुबेहूब आवाज काढून मनोरंजन केले आपल्या कलागुणांना वाव करून दिला.
विकास कुचेकर म्हणाले की नागरीकांनी आपआपल्या भागातील वास्तव्यास असलेल्या मदत करुन सामाजिक बांधिलकीची माणूस की दाखवावी असे आव्हान त्यांनी केले. 3%विशेष मुलांसाठी ज्या राखीव जागा शैक्षणिक क्षेत्रासाठी आहेत ती मुले मिळत नाहीत म्हणून भरल्या जात नाहीत, त्या भरल्या गेल्या पाहिजेत असे त्यांनी मत व्यक्त केले.
या संस्थेचे संस्थापक तुषार कांबळे म्हणाले आज तुमच्या मुळे आमच्या मुलांमध्ये आनंद निर्माण झाला .शहरातील दानशूर संस्थांनी व नागरिकांनी मदत करावी असे आव्हान केले.
यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्याक्षा संगिता जोगदंड, सहसचिव गजानन धाराशिवकर, शहराध्यक्षा मीना करंजावणे सामाजिक कार्यकर्ते सचिन करंजावणे, राहूल घोडके, प्रतिक जोगदंड, सारंगी करंजावणे, ममता अंधः कल्याण केंद्राचे संस्थापक तुषार कांबळे ईत्यादी उपस्थित होते.
