
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी –
तालुक्यातील येरमाळा येथे दोन किराणा दुकानांवर सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने सोमवार (दि.२४) रोजी छापा मारला या छाप्यात राज्य शासनाने प्रतिबंध केलेले ८ लाख ८३ हजार ६७१ रुपयांचे गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला जप्त करण्यात आला
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की येरमाळा येथील एका किरणा दुकानात प्रतिबंधित गुटखा, सुंगधित तंबाखू, पानमसाला मोठ्या प्रमाणात साठा असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांना मिळाली यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. २४) रोजी बाबा कलेक्शन दुकानाच्या शेजारी असलेल्या किराणा दुकानावर छापा मारत येथुन सुमारे १ लाख २१ हजार ८९७ रूपये किंमतीचे प्रतिबंधित गुटखा, सुंगधित तंबाखू, पानमसाला जप्त केला यानंतर त्याच दिवशी तात्काळ येडेश्वरी किराणा दुकान, राहते घर, गोडाऊनवर छापा मारत तब्बल ७ लाख ६१ हजार ८७४ रूपये किंमतीचे प्रतिबंधित अवैध गुटखा, सुंगधित तंबाखू, पानमसाला जप्त केला या प्रकरणी नामदेव पारवे, दत्तात्रय नारायण रणसिंगे दोघे रा. येरमाळा यांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हा दाखल करण्यात आले
सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड, पोलिस उपनिरीक्षक नाईकवाडे, पोलिस नाईक नवनाथ खांडेकर , किरण अंभोरे, अमोल राऊत, चालक राऊत, विशाल गायकवाड, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल तस्लिम चोपदार, प्रगती देशपांडे, पुष्पा देशमुख, आदिनी केली