
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर शहरात भव्य स्वरूपात दोन ते तीन एकराच्या परिसरा मध्ये *शिव उद्यान* तयार करण्यात यावे. ज्यात शिवकालीन गडकिल्ले, शिवरायांच्या सार्थ जीवनाचा इतिहास अंकित असलेल्या रचना समृद्ध ग्रंथालय, अभ्यासिका, इत्यादी सज्ज असाव्यात या सर्व बाबीमुळे “शिव उद्यान” हे चंद्रपूर महानगरातील सौंदर्य स्थळ व्हावे. हा या संकल्पनेमागील गर्भित मानस हेतू आहे. यातून शासनाला सुध्दा महसूल प्राप्त होईल व नवीन पिढ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनाचा इतिहासाचं नेहमी स्मरण होत राहील. अशा या मागणीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना एका शिष्टमंडळाद्वारे दि.26 एप्रिल 2023 ला देण्यात आले यावेळी समिती अध्यक्ष दिपक आनंदराव बेले, जेष्ठ समाजसेवक गजाननराव गावंडे गुरुजी, पप्पू देशमुख, शिवसेना महिला महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. उज्वला ताई नलगे, दिलीप रिंगणे, शैलेश जुमडे, नीमेश मानकर, आकाश साखरकर, मनोज बेले, निलीमा शिरे ,कुसुम ताई उदार, रवी लोणकर, एडव्होकेट अर्चनाताई महाजन,वर्षाताई काळभुत विजय मोहरे, रमेश काकडे सुरेश धारकर आदी शिवप्रेमीजन प्रामुख्याने उपस्थित होते.