
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
हिमायतनगर तालुक्यातील मौजे वारंगटाकळी येथे दिनांक 27/4/2023 रोजी धम्मक्रांती बौद्ध विहार यांच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व गावातील नागरिकांच्या सहकार्याने व भीम टायगर युवक मित्र मंडळ वारंगटाकळी यांच्या पुढाकाराने आणि *लक्ष्मण उत्तम हनवते पोलीस (SRPF पुणे) व किरण बाबुराव कांबळे पोलीस (SRPF नागपूर)* यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. सकाळी महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील अवधूत विश्वनाथ कदम सरपंच दयाळगिर गिरी पांडू देवा आडे (तंटामुक्ती अध्यक्ष) कृष्णा आंबेपावड, विशांबर कानोटे, गजानन बाचकलवाड, ज्ञानबा कदम यांनी महामानवांना अभिवादन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्र प्रतिमेची मिरवणूक वारंगटाकळी येथील मुख्य रस्त्यावरून अतिशय आनंदमय वातावरणात निघाली. रॅलीमध्ये बौद्ध वाड्यातील सर्व महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीमध्ये रामदास हनवते, संघपाल प्रधान,पिंटू कांबळे, विजय हाटे, ,श्रीकांत कांबळे,किरण हनवते,प्रथमेश चिंतलवाड, राजरतन हाट्टे, यश हनवते,पांडूरंग हनवते, आकाश कदम,निलेश कदम, चरण कांबळे,वैभव कांबळे यांनी अतिशय परिश्रम घेतले.पोलीस बंदोबस्त हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बि.डी भुतनूर साहेब बीट जामदार राठोड साहेब शिंदे साहेब बंदोबस्त साठी उपस्थित होती.