
दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी :राम चिंतलवाड
हिमायतनगर तालुक्यासह जिल्हाभरात सर्वसामान्य नागरिकांपासुन सुप्रतिष्ठित नागरिकांचा एकच चर्चेचा विषय ठरलेली ती म्हणजे हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक . मागील विस ते पंचविस दिवसांपासून चालु असलेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेना आणि भाजप व शिंदे गट यांचा पराभव करून अखेर हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचा सर्व च्या सर्व 18 पैकी 18 उमेदवारांचा दणदणीत विजय.. आडत व व्यापारी मतदार संघातुन पळसिकर संदिप शंकरराव हे 243मते घेवुन, तर स. रऊफ स. गफुर हे 215 मते घेऊन विजय झाले त्याच बरोबर ग्राम पंचायत सर्वसाधारण मतदारसंघातुन गोपतवाड परमेश्वर लक्ष्मण यांना 224मते, कदम रामराव आनंदराव यांना 201मते, त्याच बरोबर ग्राम पंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातुन शिरफुले धर्मराज गणपती यांना 229 मते . ग्रामपंचायत अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातुन भिसे दादाराव सदाशिव यांना 211मते. सेवा सहकारी संस्था व मागासवर्गीय मतदार संघातुन शिंदे सुभाष जिवनाजी यांना 130मते. सेवा सहकारी संस्था जाती भटक्या जमाती मतदार संघातुन गडमवाड श्यामराव दत्तात्रय यांना 127 मते. सेवा सहकारी संस्था महिला मतदार संघातुन वानखेडे शिलाबाई प्रकाशराव यांना 138मते. तसेच सुर्यवंशी कांताबाई सजनराव यांना 129 मते. त्याच बरोबर सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातुन वानखेडे प्रकाश विठ्ठलराव यांना 134 मते. ताडेवाड जनार्दन रामचंद्र यांना 133 मते. सुर्यवंशी संजय विनायक यांना 133मते. चिकनेपवाड राजेश मारोतराव यांना 129 मते. कोंकेवाड दत्ता पुंजाराम यांना 126 मते. टेकाळे खंडु मारोती यांना 118 मते. तर राठोड कृष्णा तुकाराम यांना 113 मते. तर हमाल माथाडी मतदार संघातुन शे . मासुम शे. हैदर हे 141 मते घेवु विजयी झाले…