
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना :अवैध धंद्यावाल्यांशी अर्थिक व्यवहार करण्यासाठी खास पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती
बिहार,,मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यात तरुणवर्गाच्या हाताला काम नसल्याने ते आई,वडील,पत्नी आणि मुला-बाळांना सोडुन महाराष्टाच्या जालन्यातील चंदनझिरा भागात राहतात,येथील स्टील कारखान्यात १८-१८ तास काम करुन पैसे जमवुन गावाकडे कुंटुबियांना पाठवतात,माञ चंदनझिरा पोलीस ठाण्यात नव्याने पोलीस अधिकारी रुजु होताच अवैध धंदे करणार्यांनी हार-तुरे घेत त्यांचे जोरदार स्वागत करुन मिठाईचे वाटप केले,
सत्कार आणि स्वागाताने भारावलेले पोलीस अधिकार्यांनी देखील या लोकांना परतफेड म्हणुन चंदनझिरा आणि एमआयडीसी भागात अवैध लाॅटर्या,कल्याण मटके,पत्याचे क्लब,गुटखा तस्करी,भंगार दुकानाच्या नावाखाली सळीया विक्री सारखे अवैध धंद्याना मुक्त परवानग्या दिल्याची चर्चा जोर धरत आहे,त्यामुळे एमआयडीसी सारख्या भागात कामागारांंना जास्त पैशांचे अमिष दाखवुन कामगारांची दिवसा ढवळ्या अर्थीक लुट चालविल्या जात आहे.
विशैष म्हणजे नविन रुजु झालेले पोलीस अधिकारी श्री खनाळ यांना या भागात सुरु झालेल्या अवैध लाॅटरी दुकानाची माहीती काही पञकारांनी त्यांना देवुन देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले,यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्या हद्दीत अवैध धंद्यावाल्यांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता दिसत आहे.
खनाळ साहेब उस्मानाबाद स्थानिक गुन्हेशाखेची जबाबदारी सांभाळुन जालन्यात आल्यानंतर त्यांच्याकडुन पञकाराबरोबरच सामान्य नागरिकाकडुन चांगल्या कामाची अपेक्षा होती,आणि सूरुवातीला त्यांनी गुन्हे उघडकीस आणुन झलक ही चांगली दाखवली,माञ आता अवैध धंद्यावाल्यांना परवानग्या दिल्या जात असल्याने पुन्हा गुन्हेगारीकण वाढते की काय असा संशय निर्माण होत आहे.