
दैनिक चालु उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
तालुक्यातील कलांबर (बु) येथील जि. प. हायस्कूल मधील इयत्ता दुसऱ्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षक गुरुजींचा वाढदिवस केक कापून शुभेच्छा पत्र देवून साजरा केला. विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून गुरूजी प्रचंड भारावले. अन् डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
जिल्हा परिषद हायस्कूल कलांबार (बू) येथील कार्यरत शिक्षक ए. एस. भोस्कर हे मागील अनेक कालावधी पासून ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करतात. भोस्कर गुरूजी हे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्यात ते अगदी रममाण होतात. गुरुजींची शिकवण्याची पद्धत ही चिमुकल्यांनी सहज समजण्या सारखी असल्याने चिमुकले लगेच त्यात अनपेक्षित तल्लीन होतात. त्यामुळेच गुरू आणि शिष्याची विना अधिक गडद झाल्याचा प्रत्यय भोस्कर गुरुजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आले आहे. एके दिवशी ‘फुग्या रे फुग्या’ ही कवीता शिकवत असताना वर्गातील एका मुलाकडे फुगा होता तो घेवून गुरुजींनी बांधला. विद्यार्थ्यांना तो खूप भावला आणि चिमुकल्यांची आणि गुरुजींची गठ्ठी वाढली. त्यातूनच गुरुजींचा वाढदिवस चिमुकल्यांनी स्वयंस्फूर्तीने करण्याचे ठरविले. त्यानुसार इयत्ता दुसरीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खाऊसाठीचे गोळा केलेले पैसे एकत्र करून गुरुजींच्या वाढदिवसानिमित्त वर्ग फुगे तसेच फुलांनी सजवून केक, मेणबत्ती, पुष्पगुच्छ आनत शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत भोस्कर गुरुजींचा वाढदिवस साजरा केला. तसेच चिमुकल्यांनी गुरुजींना शुभेच्छा संदेश पत्र व वस्तू भेट दिल्या. यावेळी अनुष्का घूले, आलिया शेख, राजवीर चंदेल, सुशांत बनसोडे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. गुरूंनी समारोप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना थ्रीइनवन वही आणि प्रत्येकी एक पेन आठवण म्हणून भेट दिली.
कार्यक्रमास शाळेचे मु. अ. नरपडवाड, जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. कापसे, केंद्रप्रमुख आढाव, केंद्रीय मु. अ. जोशी, सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, व राज्य पुरस्कार प्राप्त माध्यमिकचे मुख्याध्यापक अंकलकोटे, केदार, सौ. देशपांडे, सौ. कलने, सहशिक्षक लोंढे, आदींची प्रमुखाने उपस्थिती होती.