
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी:येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस समर्थित शेतकरी एकता गटाला १८पैकी १५जागेवर विजय मिळवला तर भाजप समर्थित किसान सन्मान आघाडीचा धुव्वा उडत ३जागेवर समाधान मानावे लागले त्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रातील पुढील निवडणुकीच्या दृष्टीने शुभलक्षण असून विधासभेसाठी महाविकास आघाडी जिंकून आणण्यासाठी मतदार वाट बघत असल्याचा हा पुरावाच असल्याचे काँग्रेस गटात बोलल्या जात आहे विजयी उमेदवारात नितीन दर्यापूरकर,राजेंद्र खवशी, संजय पठाडे,मनीष कातोडे, जयसिंग घाडगे,योगिताताई खवसे,बबन कोहळे,कैलास कालोकार,पांडुरंग कडवे,मनोज घावट,वनिताताई सोमकुवर, संदीप देशमुख,पंकज चातुरकर,राजू मस्के,दत्तू दुरगडे तर भाजप(जनशक्ती संघटना) समर्थित किसान सन्मान आघाडीचे विनायक धोंगडी, भूपेश बारंगे,रेवताबाई धोटे यांचा समावेश आहे