
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: येथील काजीपुरा रहिवासी हफीज खा हबीब खा यांच्या मालकीचा रेती भरलेला ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक प्रकरणी ७ नोव्हें २०१९ रोजी महसूल विभागाने जप्त केलेला ट्रॉली सहित ट्रॅक्टर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोष मुक्त केला आहे याबाबत असे की,महसूल मंडळ अधिकारी ओमप्रकाश
बाळस्कर यांनी तत्कालीन तहसीलदार आशिष वानखेडे यांच्या आदेशाने परसोडा मार्गावर अवैध रेती वाहतूक केल्या प्रकरणी एम.एच.४०एल.५०४० क्रमांक असलेला ट्रॉली सहित ट्रॅक्टर जप्त करून १ लाख २२ हजार ९०० रुपये दंड आकारला होता त्याअनुषंगाने ट्रॅक्टर मालकाने गयावया केली मात्र महसूल विभागाला पाझर फुटला नाही त्यामुळे ट्रॅक्टर मालक हफीज खा यांनी बेबंदशाही आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी(महसूल)आर्वी यांचेकडे अपील दाखल केले असता नामंजूर झाले त्यानंतर जिल्हाधिकारी वर्धा यांनी अपील फेटाळले पण हफिस खा यांनी हार न मानता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा.अविनाश घारोटे यांच्या न्यायालयात अपील दाखल केले असता तत्कालीन आष्टी तहसीलदार आशिष वानखेडे यांनी केलेले बेबंदशाही आदेश व दंड रद्द करून ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून देण्याचे आदेश दिले ट्रॅक्टर मालक हफीज खा यांच्या वतीने ऍड ए.एस.आय.खान,ऍड शबाना खान यांनी अभ्यासपूर्ण बाजू मांडली तर महसूल विभागाच्या वतीने सरकारी अभियोक्ता यांनी बाजू मांडली होती