
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
माथाडी कामगारांचे कायदेशीर प्रश्न लावले जातील त्यासाठी मी लक्ष घालेन असे आश्वासन जिल्हाधिकार्यानी दिल्यावर, बेमुदत उपोषण व सत्याग्रह स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याची माहिती, मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस, अड. सुभाष सावंगीकर यांनी प्रसिद्धीस दिली.
जिल्हाधिकारी मा. आस्तिककुमार पांडे यांनी गुरूवार दि.२७ एप्रिल रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी मा. वर्षा राणी भोसले, माथाडी मंडळाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत राऊत, कामगार प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांचे उपस्थितीत, बैठक घेवून, जिह्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबित व कायद्यांचे चौकटीतील सर्व प्रश्न समजून घेतले. कायद्याच्या चौकटीतील प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहतातच कसे, असे विचारून, सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश माथाडी मंडळाला दिले आणि पुरवठा विभागाशी, व गोदामाशी संबंधीत सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविले जातील , त्यात मी स्वतः लक्ष घालेन असे ठोस आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले……
बैठकीस माथाडी मंडळाचे सचिव मा. संभाजी मुंढे, सह पुरवठा अधिकारी मा.जोंधळे मॅडम, कामगार प्रतिनिधी व मराठवाडा. लेबर युनियन चे साथी प्रवीण सरकटे, साथी जगन भोजने, साथी सचिन पगारे, इ. चा सहभाग होता ….
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली गेली नाही तर, माथाडी कामगार पुन्हा रस्त्यावर येवून आंदोलन तीव्र करतील, ज्यात लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चे, पदयात्रा, मुंबई येथे निदर्शने, आणि गरज पडली तर जेल भरो आंदोलन ही केले जाईल ,असा इशारा उपोषण सोडतांना, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर, माथाडी मंडळाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत राऊत यांनी तातडीची बैठक बोलाविली व कामगार प्रतिनिधी सह, माथाडी मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेवून, सर्व प्रश्न निश्चीत कालमर्यादेत सोडविण्याचे लेखी पत्र दिले व गेले १० दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेले उपोषण सत्याग्रह संपवावा अशी विनंती केली…… तसेच एक तातडीची बैठक दि.८ मे रोजी घेतली जाईल असेही सांगितले .
यानंतर सायंकाळी ६ वाजता, माथाडी मंडळाचे अधिकाऱ्याचे उपस्थिती, माथाडी कामगारांनी ११ दिवसापासून सुरू असलेला सत्याग्रह स्थगित केला.
प्रमुख मागण्या.
# माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी..
# गोदाम माथाडी कामगारांचा १५-२० महिन्याचा पगारातील फरक.
# २०१४ पासून गोदामातील माथाडी कामगारांचा , प्रलंबीत असलेला महागाई निर्देशांक त्वरित दिला जावा…..
# सिल्लोड येथील ( २०१२ मधील) ६ महिन्याचा थकित पगार.
# गोदामात स्वच्छता व विश्राम गृह… पिण्याचे स्वच्छ पाणी…. परिसर स्वच्छता…
# कारखाने/ बाजार समिती/ वखार महामंडळ/ बाजार पेठात माथाडी कायद्याचे अमलबजावणी कडे माथाडी मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष्य.
# कायदेशीर थकबाकी वसुली कडे माथाडी मंडळ व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष्य.
# माथाडी मंडळ, सातत्याने मालक व
कारखानदारांचे दबावाखाली असल्याने माथाडी कायद्याची कठोर अमलबजावणी केली जात नाही, परिणामी नोंदित माथाडी कामगारांना, आपल्या हक्काचे रोजगारापासून वंचित ठेवले जाते. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते… अशी असंख्य उदाहरणे देता येतील.