
दैनिक चालु वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
आज 28 एप्रिल 2023 रोजी गणित विज्ञान मंडळ म्हसळा आणि माध्यमिक शिक्षक संघटना यांचे वतीने गणित संबोध शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत आणि सहभागी विद्यार्थी तसेच राष्टीय बाल विज्ञान परिषद सहभागी सर्व विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र वाटप कार्यकम मा गटशिक्षणाधिकारी म्हसळा श्री संतोष दौड साहेब यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाला.
याच कार्यक्रमात गणित विज्ञान मंडळाचे ज़िल्हा पदाधिकारी श्री तांबे सर यांना सेवा निवृत्ती निमित्य विशेष कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यातआला सोबत तालुक्यातील या वर्षी निवृत्त होत असलेले शिक्षक मुलांनी सर, सातपुते सर, नदाफ सर यांचा देखील सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात म्हसळा तालुका मधून पहिली महिला पोलीस पदी निवड झालेली कु श्रुती सुनील शिगवण हिचा देखील गणित विज्ञान मंडळाच्या वतीने म्हसळा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
म्हसळा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विनयकुमार सोनवणे, गणित मंडळ अध्यक्ष अली सर, म्हसळा शिक्षक परिषद चे अध्यक्ष नितीन पाटील, गणित विज्ञान मंडळ परीक्षा विभाग ज़िल्हा पदाधिकारी किरण चाळके, प्रा. शेख एम ए. यांच्या नियोजना खाली या त्रिवेणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दिगंबर टेकळे, प्राचार्य पी एल हाके, गट समन्वयक कौचाली, केंद्र प्रमुख किशोर मोहिते निलेश मांदाडकर , सर्व साधन व्यक्ती प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाल विज्ञान परिषद मध्ये ज़िल्हा स्तरावर सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचीन्ह देऊन गौरवण्यात आले व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांना देखील सन्मानपत्र देण्यात आले. यात अश्विनी गुंडरे, संगीता निरणे, जयसिंग बेटकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच श्रेयसी बालाजी माने, केदार बाळकृष्ण पाटील, तनिष्का दीपक पाटील, धनसे इरम, कौचाली जोया, कौचाली अनाम, घरटकर बरीरा, मिसाळ सार्थक, आर्या प्रदीप कांबळे, लकी राजेश बामणे, तन्मय सचिन काते या विद्यार्थ्यांना देखील सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जाधव सर यांनी केले तर आभार संदीप कांबळीकर सर यांनी केले.