
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत पुर्व तयारी मेळावा संपन्न झाला.शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये.लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येत आहेत.वयाची सहा वर्ष पूर्ण झालेल्या अंगणवाडीतील बालकांना पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार गुरूवारी दि. 27 एप्रिल रोजी पारडी येथील शाळेत पुर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या वतीने उपस्थितांचे पुष्प गुच्छ देवून तर पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या अंगणवाडी तील बालकांना पुष्प देवून भव्य स्वागत करण्यात आले.
लोहा पं.स.चे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी सर्जेराव टेकाळे, केंद्र प्रमुख बाबुराव फसमले यांच्या मार्गदर्शनाखाली पं.स.चे विषय तज्ञ संजय अकोले, मुख्याध्यापक किसवे एम एल यांच्या प्रमुख उपस्थितीत व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल डिकळे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न झाला.
दि.27 एप्रिल रोजी पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्या-या विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी? कोणती काळजी घ्यावी? मार्गदर्शन करण्यात आले.सदरील शाळा पूर्व तयारी पहिले पाऊल मेळावा क्रमांक १ यात एक ते सात टेबलावरील सर्व कृती विद्यार्थ्यांकडून करून घेऊन विद्यार्थ्यांच्या शारीरिक,बौद्धिक, भावनिक विकासाबाबत माता-पालकांना विविध माहिती देण्यात आली.
सदरील शाळा पुर्व तयारी मेळाव्यास सरपंच प्र.संभाजी पवार, उपसरपंच प्र.गोविंद डिकळे,ग्रामपंचायत सदस्य प्र.अरुण पवार, सदस्य प्रकाश गायकवाड, पो.पा.विनायक मटके,शाळेतील शिक्षक बालाघाटे डी.पी., देशमुख जी.एल.,सौ. कदम जे.ए.,सौ.गंगाखेडकर सी.पी.,सौ इंगोले एस.एस.,सौ.कदम आर.जी.,अंगणवाडी ताई शारदा डिकळे, सुनिता कदम, उषा पवार,आशा वर्कर कमल कदम,लक्ष्मण रोकडे,शंकर डिकळे, ग्रामपंचायत सेवक शंकर डिकळे,व्यंकट डिकळे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,माता पालक संघाचे सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला पालक उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पदवीधर शिक्षक बालाघाटे डी.पी.यांनी तर आभार जी.एल.देशमुख यांनी मानले.