दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनिधी:- दशरथ आंबेकर
तालुक्यातील मौजे परोटी तांडा येथील प्रगतीशील शेतकरी एडवोकेट अरविंद चव्हाण यांच्या शेतात विजेचे तार लटकत असून वारंवार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला कळवून सुद्धा विद्युत महामंडळांनीअद्याप याकडे वेळोवेळी सांगितल्याने सुद्धा सूचना दिल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.त्वरीत हे तारे काढावी अशी मागणी एडवोकेट अरविंद चव्हाण यांनी केली असून त्वरित न काढल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी एडवोकेटअरविंद चव्हाण यांनी दिलाआहे.सदरील तार शेतात लोबंकळतअसल्यामुळे शेतकरी अडथळा निर्माण होत आहे. वारंवार कळवून सुद्धा महाराष्ट्राचे विद्युत महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नाईलाज असतो एडवोकेट अरविंद चव्हाण यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.
