दैनिक चालु वार्ता चाकूर तालुका प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहातील सफाईगार प्रकाश घोबाळे हे प्रदीर्घ काळाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.त्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
निरोप समारंभाचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला.याप्रसंगी गृहपाल वर्षा चौधरी यांनी सेवानिवृत्त सफाईगार प्रकाश घोबाळे यांचा सपत्नीक सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शासकीय मुलांच्या वस्तीगृहाचे गृहपाल किशन फड,बालाजी फड,विजय आडतराव यांच्यासह कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गृहपाल वर्षा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सफाईगार प्रकाश घोबाळे यांनी अतिशय जबाबदारी व उत्कृष्टपणे सेवा बजावून सेवेतून निवृत्त होताना दुःख होते.परंतु सेवेत दाखल होणे आणि सेवा संपल्यानंतर निवृत्त होणे.हा सृष्टीचा नियम असून हे चक्र फिरतच असते असे सांगून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
