दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनिधी:-दशरथ आंबेकर
तालुक्यात शनिवार संकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील मौजे मांडवी ,सारखणी, सिंदगी ,बोधडी,घोटी ,गोंकुदा चिखली,धानोरा,जलधारा,शिवणी, कोसमेट,ईस्लापुर,परोटी तांडा सह परिसरातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे.तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळुन पडली होती.तर अनेकांच्या घरा वरची टीनपत्रेउडून गेलीआहेत.त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान झालेआहे.अवकाळी पावसाच्या गारपिटीचा तडका तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
तालुक्यात आज दि.३० एप्रिल संकाळी साहा वाजल्या पासून अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावून,त्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला होता.येथील मुख्य नाली मधुन पावसाच्या पाण्याने घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची काढणीला आलेली हळदी पिका सह आंबा,उन्हाळी ज्वारी,तीळ,मका रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे.सध्या हळद काढणीचा मोसम सुरु असून,बहुतेक भागात हळद शिजवण्याचे कामे सुरु आहे.याअवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची हळद भिजून तिचे नुकसान झाले आहे.अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसाने सर्व शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून त्या शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
