दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड मराठा समुह आयोजित मराठा व्यावसायिक मेळावा
आरंभ NEET & IIT फौंडेशन नांदेड मध्ये पार पडला..
या मेळाव्यात समाजाच्या प्रत्येक भागातील म्हणजे परभणी ते जर्मनीत स्थायिक मराठा, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, अगदी भाजी विकणाऱ्या व्यापाऱ्यांपासून ते सॉफ्टवेअर क्षेत्रातील मराठा बांधवांनी उपस्थिती दर्शवली..
समाजासाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या अश्या व्यावसायिक बांधव, व मार्गदर्शक व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गाढे सर,विजय ताठे सर यांनीनी केले.
गर्दी पेक्षा दर्दी मराठा एकत्र आल्यावर क्रांती घडते आणि त्याचा पाया ह्या मेळाव्यात भरला पुढे ह्याचे रूपांतर मराठा उद्योग क्रांती मध्ये करू असा विश्वास मराठा समूहाचे, अडमीन संतोष पाटील शिंदे यांनीनी आभार प्रदर्शनात व्यक्त केला..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर थेटे सर, कृष्णा शिंदे, कुणाल हंगरगे, प्रियंका ताई कैवारे, अमोल नलावडे, जगदीश जाधव यांनीनी परिश्रम घेतले..
प्रत्येक मराठा समाजाच्या कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण करणारे सुधाकर देशमुख यांनी फोटो काढून आपली मराठा सेवा केली. दैनिक चालु वार्ता चे मुख्य संपादक श्री. डि. एस. लोखंडे पाटील यांनी पेपर मध्ये प्रसिद्धी दिली ,पत्रकार बाजीराव पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला.
