दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:-कंधार तालुक्यातील कळका येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम बाजूला कळका ते कंधार रोडवर चार दिवसांपासून रोडवर खांब पडून असून महावितरण याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कंधारला जाण्यासाठी रस्ता बंद आहे. तसेच परिसरातील नागरिकांना शाॅक लागण्याची भीती निर्माण झाली आहे. जनावरे, लहान मुले, वयस्कर नागरिकांना अतिशय त्रास होत आहे. तेव्हा महावितरणने झोपेतून उठून लवकरात लवकर पोल उभा करून विद्युत प्रवाह सुरळीत चालू करण्यात यावा अशी मागणी कळका येथील नागरिकांनी केली आहे. अगोदरच अतिवृष्टी, गारपीट, वारे वादळ त्यातच लाईट बंद असे त्यांनी सांगितले आहे. दिलीप कळकेकर यांनी दैनिक चालु वार्ताशी कळविले आहे.
