दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथे भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील १०० व्या मन की बात या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या १०० महिन्यांपासून आपल्या देशातील जनतेला त्यांच्या सरकारने केलेल्या विविध विकास कामाबद्दल योजने संदर्भात देशातील जनतेला दर महिन्याला संबोधित करीत आहेत आज दि.३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड कार्यक्रम होता.
हा कार्यक्रम लोहा शहरातील जनतेला पाहता यावे . पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विविध योजना विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लोहा न.पा.चे भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत आहेत.
तसेच नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन साहेब यांच्या माध्यमातून लोहा शहराचा चौफेर विकास करीत आहेत.
तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्य ही मोठ्या जोमाने सुरू आहे.
आज दि. ३० एप्रिल २०२३ रोजी आपल्या भारत देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सकाळी ११ वाजता मन की बात या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड कार्यक्रम संपन्न झाला यावेळी लोहा शहरातील जनतेला हा कार्यक्रम पाहता यावे म्हणून लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी त्यांच्या देऊळगल्ली येथील वाड्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी , नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, जेष्ठ नागरिक गंगाधरराव महाबळे, सचिन सुर्यवंशी केशव पवार ज्ञानेश्वर भिसे , माधव वसमतकर काशीनाथ शेटे दसरथ गुंठे बालाजी आईनवाडीकर पांडुरंग रहाटकर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
