
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी
: बिलोली तालुक्यातील खतगाव येथील रहिवासी असलेले कलाध्यापक तथा ग्रामीण कवी बालाजी पेटेकर यांचा मुलगा ओमकार पेटेकर बुद्धिबळ खेळाडू हा आगामी वैद्यकीय महाविद्यालयीन अंतर्गत बिहार राज्यातील पाटणा येथे होणाऱ्या वैद्यकीय चॅम्पियन शिप बुद्धिबळ स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ओमकार पेटेकर यांचे जन्म नांदेड जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील खतगाव या खेड्यात झाला आहे. लहानपणा पासूनच बुद्धीबळ स्पर्धेचे वेड असलेला व सद्या मुंबई येथिल जे.जे.वैद्यकिय महाविद्यालयाचा एम बि बि एस वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेला विद्यार्थ्यी हा मागील झालेल्या अखिल भारतीय वैद्यकीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप च्या विद्यमाने खेळविण्यात आलेल्या भारतातील संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अत्यंत मानाची स्पर्धा खेळवण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये देशातील २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.आणि या चुरशीच्या स्पर्धेमध्ये तो २०० स्पर्धकातून नवव्या क्रमांकाने यशस्वी झाला असल्याने तो आता ता.१० मे रोजी बिहार राज्यातील पटणा या शहरात होणाऱ्या वैद्यकीय चॅम्पियन शिप बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालय तर्फे त्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे .
त्याला महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालय तर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मुंबई येथील जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक वर्ग व सर्व मित्र परिवारांनी त्याचे अभिनंदन केले. बिहार येथील पाटणा या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.त्यास अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेचे प्रतिनिधित्व मिळाले असल्याने त्यांचे माजी मंत्री मा.खा.भास्कररावजी पाटील खतगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजीराव खतगावकर ,बाळासाहेब पाटील खतगावकर,काॅंसग्रेच्या वरीष्ठ उपाध्यक्ष मिनलताई पाटील खतगावकर,रवी पाटील खतगावकर, यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच आदमपुर,खतगाव व परिसरातील मित्रपरिवार, हितचिंतकांनी ही शुभेच्छा दिल्या आहेत.