
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना- महाराणा प्रताप सिंह हे मेवाड येथील उदयपूरच्या शिशोदिया राजवंशाचे राजा होते. शौर्य, धैर्य आणि वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी येथे केले.
लोधी मोहल्ला येथे महाप्रताप सिंह यांची जयंती आज मंगळवार दि. 9 मे रोजी विष्णु पाचफुले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाराणा प्रताप सिंह यांनी मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी 1576 मधील हल्दीघाटीच्या लढाईसह अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या. गनिमी युद्धाद्वारे लष्करी प्रतिकारासाठी महाराणा प्रताप सिंह हे प्रताप लोकनायक बनले, असे सांगून त्यांनी प्रत्येकाने महाराणा प्रताप सिंह यांचे विचार अंगीकारावे, असे आवाहन केले.
प्रारंभी विष्णू पाचफुले यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आशिष पाचफुले, जयपाल सिंग, बंडूसिंग वर्मा, अनिलसिंग सूर्यवंशी, नरेंद्र वर्मा, सुनिलसिंग चौधरी, लक्ष्मणसिंग वर्मा, बालाजी राजपुत, गजेंद्रसिंग वर्मा, रामानंदन सुर्यवशी, आदित्य सूर्यवंशी, रोहण वर्मा, दिनेश सूर्यवंशी, यश सूर्यवंशी विवक वर्मा, अभिजित अंभोरे, संजय चौधरी, लालसिंग वर्मा, प्रताप वर्मा, रामलाल सूर्यवंशी, योगेश राजपुत, नंदूसिंग राजपुत, शंकरसिंग राजपुत, उमेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.